धूम्रपान सोडण्याचे ५ उपाय!

1498
SHARE
Loading...

धूम्रपान हे समाजातल्या सर्व स्तरांमधील लोकांना असलेले व्यसन आहे. गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष कोणीही याला अपवाद नाही. याच्या दुष्परिणामांची चर्चा सतत होत असूनही फॅशन, लाईफस्टाईल किंवा क्रेझ म्हणून व्यसन केलं जातेयं. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या धूरांचे श्र्वासावाटे सेवन केल्यामुळे विवध आजार जडतात. आधी खोकला, श्वास घेण्यास अडचणी असे विकार होतात. पुढे ह्रद्यविकार, कर्करोगासारखे आजार बळावतात.


तंबाखूजन्य पदार्थांमधून मिळणाऱ्या निकोटीन या द्रव्यामुळे माणूस त्याच्या व्यसनात अडकतो. एखादी व्यक्ती खूप वर्षे तंबाखू खात असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थांचा धूर ओढत असेल आणि त्याला एकदम थांब म्हणून सांगितले तर त्या व्यक्तीच्या शरीराला निकोटिनची सवय झालेली असल्यामुळे तसे करणे शक्य होत नाही. त्याने तसे करणे थांबवल्यास शरीरातील पेशी निकोटिनची मागणी करू लागतात. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये बिडी, सिगारेट, हुक्का इत्यादींचा समावेश असतो. धुम्रपानामुळे होणाऱ्या महाभयंकर धोक्यापासून वाचण्यसाठी खाली काही सोप्या टिप्स आहेत.
– दुधाचा वेगळ्या पद्धतीने वापर करून तुम्ही सिगारेटची सवय सोडू शकता. सिगारेट दुधात बुडवा आणि पूर्णपणे वाळू द्या. दुधामुळे सिगारेट ओढताना कडवट चव मिळेल. हा कडवटपणा तोंडात दीर्घकाळपर्यंत राहील. त्यामुळे पुन्हा सिगारेट पिताना तुम्ही दोन वेळा विचार कराल.


– धूम्रपानामुळे शरीराला आवश्यक असलेल्या ‘क’ जीवनसत्वाचा पुरवठा खंडित होतो. धुम्रपान टाळण्यासाठी संत्री, लिंबू आणि डाळींब अशा फळांचे सेवन करावे. त्यामुळे ‘क’ जीवनसत्वाची कमतरता भरून निघेल. संत्र्याच्या रसामुळे धूम्रपानाची सवय लवकर सुटू शकते.
– धूम्रपान करण्याची इच्छा झाल्यास सॉल्टी चिप्स खा. धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी मीठाचा वापर केलेले स्नॅक्स उत्तम पर्याय आहे. किंवा जेव्हा सिगारेट पिण्याची इच्छा होईल तेव्हा थोडेसे मिठ जिभेवर ठेवावे.
– एका हळकुंडाचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्‍याची इच्छा होईल तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून चघळावे. काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते.
– सिगारेट सोडण्यासाठी दालचिनी बारीक वाटून मधामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा झाल्यास ते मिश्रण बोटाने चाटावे
– कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्‍याची सवय सुटते.

Loading...