तरुणींच्या हृदयावर राज्य करतोय हा आयपीएस अधिकारी

2603
SHARE
Loading...

सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो त्या व्यक्तीला किती प्रसिद्धी मिळवून देऊ शकतो हे वेगळं सांगायला नको. पाकिस्तानचा चहावाला, नेपाळची भाजीवाली याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रातोरात त्यांना तुफान प्रसिद्धी लाभली होती. जणू ते सोशल मीडियावरचे स्टार झाले, पण त्यांची क्रेझ आता जुनी झाली. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती आयपीएस अधिकारी सचिन अतुलकर यांची. २२ व्या वर्षी ते आयपीएस अधिकारी झाले. आणखी एक गोष्ट सांगायची तर राष्ट्रीय पातळीवर ते क्रिकेट खेळले आहे. यात त्यांनी सूवर्णपदक मिळवलं आहे. तर घोडेस्वारी मध्येही त्यांनी सूवर्ण पदक पटकावलं आहे. ते मध्यप्रदेशचे आयपीएस अधिकारी आहे आणि आता ते बंदवागावात रुजू झाले आहेत.


अनेकदा त्यांची तुलना बॉलीवूडच्या कलाकरांबरोबरही केली गेली. त्यांच्या फॉलोवर्सची संख्या तर सर्वाधिक आहे. सचिन यांनी फोटो अपलोड केल्यावर त्यांच्या प्रत्येक फोटोला १० हजारांहून अधिक लाईक्स असतातच. त्यातून हे ‘फिट आणि हँडसम’ आयपीएस ऑफिसर तरूणींमध्ये तर खूपच प्रसिद्ध आहेत.

Loading...