स्वप्नदोष समस्येवर काही घरगुती उपाय जाणून घ्या…

3645
SHARE
Loading...

मी १७ वर्षांचा असून माझा प्रॉब्लेम जरा लाजिरवाणा आहे. अनेकदा मी सकाळी उठल्यावर माझ्या नकळत वीर्य उत्सर्ग (ejaculat) झालेलं असतं. नंतर मला कळलं की याला स्वप्नदोष ( night fall) म्हणतात. पण मला कळत नाही हे काय होतंय? का होतंय? आणि यामुळे कोणता धोका तर नाही? तसंच यावर काही घरगुती उपाय आहे का? ते मला जाणून घ्यायचय.

खरं तर ही समस्या किंवा आजार नसून नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
स्वप्नदोष (night fall) म्हणजे काय? आणि ते का होतं ?
स्वप्नदोष म्हणजे वीर्य उत्सर्जन (nocturnal emission or involuntary ejaculation) जे साधारतः किशोरवयीन मुलांमध्ये होतं. प्यूबर्टी च्या वेळी मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे वीर्य उत्सर्जन होते. ही नैसर्गिक क्रिया प्रौढ अवस्थेपर्यंत चालू असते. खरतर या प्रक्रियेत शरीरातील अतिरिक्त स्पर्म (शुक्राणू) आणि सीमन (वीर्य) बाहेर पडतात. मनात कोणत्याही प्रकारची अस्वस्थता असेल किंवा कामोत्तेजक स्वप्न पाहिल्यामुळे स्वप्नदोष होतो.


यामुळे आरोग्याला काही धोका तर नाही ना?
अजिबात नाही. जोपर्यंत तुम्हाला कोणत्याही लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत नाही. हे अतिशय सामान्य आहे. शरीरातील अतिरिक्त स्पर्म सेक्स केल्याने किंवा हस्तमैथून केल्याने बाहेर पडतात. जर तुम्ही या दोघांपैकी काहीच करत नसाल तर ते स्वप्नदोषाद्वारे शरीराबाहेर पडतात.

यावर काही नैसर्गिक उपाय आहेत का?
वैज्ञानिकदृष्ट्या स्वप्नदोष समस्येचे काही वाईट परिणाम होत नाहीत. काही उपाय ज्यामुळे स्वप्नदोषाचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होईल.


झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ करा: गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर व मनावरील थकवा दूर होऊन आराम मिळतो. तसंच झोपण्याआधी गरम पाण्याने अंघोळ केल्यास गाढ झोप लागते आणि स्वप्नदोषाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. हे कसे होते तर तुमचे मन शांत असते. त्यामुळे ते अनेक गोष्टीचा विचार करत नाही अगदी कामभावनेचाही. त्यामुळे स्वप्न पडत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे स्वप्नदोष होत नाही.

कामउत्तेजक काही वाचू किंवा पाहू नका: जर तुम्ही काही झोपण्याआधी भीतीदायक वाचलं किंवा पाहिलं तर तुम्हाला वाईट किंवा भीतीदायक स्वप्न पडतं. तसेच तुम्ही काही कामउत्तेजक वाचलं किंवा पाहिलं तर मेंदू त्या आठवणी होल्ड करून ठेवतो आणि परिणाम म्हणून तसंच स्वप्न पडतं. त्यामुळे स्वप्नदोष आटोक्यात आण्यासाठी रात्रीच्या वेळी काही कामउत्तेजक वाचू किंवा पाहू नका.

रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी घ्या: झोपण्याआधी ग्रीन टी प्यायल्याने विशेषतः तुळशीयुक्त ग्रीन टी घेतल्याने मन व शरीर शांत होतं. त्यामुळे नक्कीच स्वप्नदोषा होण्याची संभावना कमी होते.

व्यायाम: व्यायामामुळे तुम्ही फक्त तंदुरुस्त राहत नाही तर शांत झोपही लागते. यामुळे स्वप्नदोषाला प्रतिबंध होतो. जर यावर तुम्हाला नैसर्गिक उपाय हवा असेल तर आयुर्वेदिक वैद्य तुम्हाला शिलाजीत, वंग भस्म, ब्राह्मरी किंवा जायफळ घेण्याचा सल्ला देतील.

Loading...